सैन्यदल देशाच्या भूभागाचे रक्षण करण्यास सक्षम, राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणत्याही परिस्थितीत सैन्यदल देशाच्या प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण करण्यास सक्षम आहे, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज व्यक्त केला. दार्जिलिंगच्या सुकना युद्धस्मारकात शस्त्रपूजन करताना ते बोलत होते. विजयादशमीनिमित्त या शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदुस्थान आणि चीन सीमारेषेवर तणाव आहे. तणाव संपून शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आसावेत अशी आमची इच्छा आहे. शांतता स्थापन करण्याची हिंदुस्थानची भूमिका आहे. मात्र, शत्रूने कोणत्याही कुरापती काढल्या किंवा काही आगळीक केली तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सैन्यदल सक्षम आहे, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच गलवान खोऱयातील परिस्थितीबाबत बोलताना राजनाथ सिंह यांनी सैन्यदलाचे कौतुक केले. सध्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दार्जिलिंग आणि सिक्कीम दौऱयावर आहेत. सुकमा युद्धस्मारकात शस्त्रपूजनप्रसंगी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एम. एम. नरवणे उपस्थित होते.