टीम इंडियाची कमाल,चाळीस वर्षांत दोन विश्वविजेतीपदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

टीम इंडियाने 1975 आणि 1979 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर 1983 च्या स्पर्धेत कपिलदेवच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी क्रिकेट संघाने बलाढ्य वेस्ट इंडीजसह रथी-महारथी संघांना पराभूत करीत पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला. तिथूनच हिंदुस्थानी क्रिकेटच्या सुवर्णकाळाला आणि क्रिकेटमध्ये महासत्ता बनण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. टीम इंडिया आणि टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचा दबदबा जगभरात झाला. त्यानंतर हिंदुस्थानी क्रिकेटचा ‘चाणक्य’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 2011 चा विश्वचषक पटकावता आला. यंदा फॉर्मात असलेला हिंदुस्थानी क्रिकेट संघ आपल्या तिसर्‍या विश्वविजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे.

wc-indian-statistic

1975 ते 2015 या 40 वर्षांत 11 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आल्या त्यातील दोन हिंदुस्थानने जिंकल्या तर एकदा उपविजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन संघाने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली असून दोन वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. वेस्ट इंडीजने दोनदा तर श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी 1-1 वेळा जेतेपदाचा बहुमान पटकावला आहे.