लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने मुंबईत बांधले 19 पादचारी पूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेने लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करत रेल्वे स्थानकांवर 19 पादचारी पूल बांधले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

राज्यात लॉकडाऊन जारी केल्यानंतर अनेक दिवस लोकल बंद होती. नंतर अनलॉक करताना आधी अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांना लोकल प्रवाशाची मुभा देण्यात आली. त्यानंतर सरकारी कर्मचारी, पत्रकार आणि महिलांनाही प्रवासाची मुभा देण्यात आली. या काळात मुंबई आणि उपनगरातील स्थानकांवर गर्दी नव्हती. त्याचाच सदुपयोग करत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने 19 पादचारी पूल बांधले आहेत.

एप्रिल 2019 मध्ये मुंबई आयआयटीने मुंबईतील 50 पूल हे धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यापैकी 30 पूलांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते. पश्चिम रेल्वेतील 16 पूल हे तोडून नव्याने बांधणे गरजेचे होते. त्यापैकी 13 पूल तोडण्यात आले होते. मध्य रेल्वेवरील विक्रोळी, ठाकुर्ली आणि डोंबिवली स्थानकावरील पूलांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांचे लोकार्पणही झाले आहेत.

दादर अंध्री आणि गोरेगाव स्थानकावरील पुल तोडण्याचे काम सुरू असून 31 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.  एप्रिल 2020 पासून 14 नवे पादचारी पूल सुरू करण्यात आले आहेत असेही अधिकार्‍यांनी नमूद केले.