स्पेनविरुद्धची मालिका २-२ अशा बरोबरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ,माद्रिद

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने मंगळवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनला ४-१ अशा फरकाने धूळ चारून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. कर्णधार राणी आणि गुरजीत कौर यांनी प्रत्येकी दोन गोल करीत हिंदुस्थानच्या विजयात चमक दाखवली.

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने या लढतीत दमदार खेळ केला. हिंदुस्थानी हॉकीपटूंच्या आक्रमणापुढे स्पेनच्या संघाची डाळ शिजली नाही. राणीने ३३ व्या व ३७ व्या आणि बचावपटू गुरजीत कौरने ४४ व्या व ५० व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. स्पेनकडून एकमेव गोल केला तो लोला रिएरा हिने. तिने ५८ व्या मिनिटाला गोल केला.