अवघ्या 999 रुपयांत करा विमानप्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

इंडिगो एअरलाइन्सने विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. इंडिगोने 10 लाख विमान तिकिटांची विक्री सुरू केली आहे. या सेलमध्ये तिकिटाची किमान किंमत 999 रुपये आहे. हा सेल 6 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 18 सप्टेंबर 2018 ते 30 मार्च 2019 पर्यंतच्या विमानप्रवासासाठी हा सेल आहे. मोबाईल वॉलेट मोबिक्विकच्या माध्यमातून पैसे भरणाऱ्या  ग्राहकांना 600 रुपयांपर्यंत म्हणजेच 20 टक्के कॅशबॅकही मिळणार आहे. कंपनीतर्फे चार दिवसांचा फेस्टिवल सेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहक आमच्या नेटवर्कमध्ये कुठेही प्रवास करू शकतात. तिकिटाची किंमत 999 रुपयांपासून पुढे असेल, अशी माहिती कंपनीचे मुख्य वाणिज्य अधिकारी विल्यम बोल्टर यांनी दिली.