इंडिगोच्या शारजाह-हैदराबाद विमानाचे पाकिस्तानच्या कराचीत एमरर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानातील कराची येथील विमानतळावर आज आणखी एका भारतीय विमानाला एमरर्जन्सी लँडिंग करावी लागली आहे. इंडिगोच्या शारजाह-हैदराबाद फ्लाइट मध्ये वैमानिकाला तांत्रिक दोष आढळून आला. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकाने हे विमान कराची येथे उतरवले. कराची विमानतळावर आता या विमानाची तपासणी केली जात आहे. दरम्यान या विमानातील प्रवाशांना हैदराबादला जाण्यासाठी कंपनीच्या वतीने कराचीला अतिरिक्त विमान पाठवले जात आहे असे इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या 2 आठवड्यात कराचीमध्ये एमरर्जन्सी लँडिंग करणारी ही दुसरी भारतीय विमान कंपनी आहे. यापूर्वी स्पाईसजेटचे विमान पाकिस्तानमधील या विमानतळावर उतरावे लागले होते. 5 जुलै रोजी स्पाइसजेटच्या विमानाचे पाकिस्तानच्या कराचीमध्ये एमरर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान कराची विमानतळावर उतरवण्यात आले होते. स्पाइसजेटचे हे विमान एसजी-11 दिल्लीहून दुबईला जात होते. सुदैवाने या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप होते.