हक्कभंग समितीची अर्णबला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिपब्लिक टीव्ही संपादक अर्णब गोस्वामी याला विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. नोटीस बजावूनही हजर न राहिल्याने समन्स बजावण्यात आले असून उद्या बुधवारी अर्णबला विधिमंडळात हजर राहावे लागणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक व पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामीविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता.

यानंतर अर्णब गोस्वामीला विधिमंडळात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती, पण नोटीस बजावूनही गैरहजर राहिल्याने पुन्हा एकदा समितीकडून गोस्वामीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.