वेगमर्यादेसाठी महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

अपघातांमध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी प्राधान्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वेगमर्यादेसाठी महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून वित्तीय तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येथे केले.

जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूरचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सोलापूर शहरचे पोलीस निरीक्षक व्ही. बी. सिद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अधीक्षक अभियंता अश्विनी वाडकर, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर गतिरोधक, वेगमर्यादेचे व दिशादर्शक सूचनाफलक लावाकेत. प्राणांतिक अपघात वाढल्यामुळे विभागांनी बेशिस्त वाहनचालकांकर कडक कारकाई करावी. महामार्गावरील रस्ता दुभाजक फोडणाऱ्या हॉटेल, ढाबाचालक, नागरिकांवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस विभागाला यावेळी दिले.

अपघातांची आकडेवारी व त्यास कारणीभूत ठरणाऱया घटकांचा संबंधित यंत्रणांनी अभ्यास करावा. हेल्मेट वापरण्यासंबंधी तसेच वाहतुकीच्या नियमांसंबंधी प्रबोधन करावे. अपघात प्रकण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्राच्या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असेही ते म्हणाले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी अपघात प्रकण (ब्लॅक स्पॉट) क्षेत्रांसंदर्भात माहिती दिली. सोलापूर जिह्यातील अपघातांची आय रॅड (इंटिग्रेटेड रोड ऍक्सिडेंट डाटा बेस) ऍपमध्ये माहिती भरण्याचे काम 97 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.