विमा कुटुंबाचा आधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
life-insurance

>> शैलेंद्र जगताप  (गुंतवणूक सल्लागार)

 विम्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते किंवा गृहित धरले जाते. परंतु त्याचे दीर्घकालीन फायदे चांगले आहेत,  नवीन वर्षाचे संकल्प सोडताना विविध गोष्टींसाठी असलेल्या विमा कवचांचा समावेश करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि कुटुंबाला सुरक्षित करा.

 आपण सर्वजण नवीन वर्षासाठी नवीन संकल्प सोडतो आणि आता ती वेळ आली आहे. तुम्ही संकल्प सोडण्याच्या तयारीत असाल तर तो अत्यंत वेगळा का असू नये!  कोणत्याही परिस्थितीत, येत्या वर्षासाठी तुम्ही निश्चितपणे काही उद्दिष्टय़े डोळय़ांसमोर ठेवून  विम्याकडे पाहिले पाहिजे. विम्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते किंवा गृहित धरले जाते. परंतु त्याचे दीर्घकालीन फायदे चांगले आहेत,  नवीन वर्षाचे संकल्प सोडताना विविध गोष्टींसाठी असलेल्या विमा कवचांचा समावेश करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा.

आरोग्य विम्यासह निरोगी राहा

मानसिक किंवा आर्थिक ताणतणावांचा आरोग्यावर परिणाम होतो. जितका तणाव कमी असेल तितके तुम्ही जीवनात आनंदी आणि निरोगी राहाल. आरोग्यदायी नसण्याचा अर्थ म्हणजे वारंवार डॉक्टर अथवा रुग्णालयात जाणे. म्हणजे आर्थिक खर्च. सर्वोत्तम वैद्यकीय सेवेच्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्याचे आपण सगळे जाणतो आणि हे खर्च प्रत्येकाला परवडण्यासारखे नाहीत. यासंदर्भात आरोग्य विमा ही जीवनरेखा असल्यासारखी आहे.  रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतर होणारा खर्च आरोग्य विमा भरून काढतो.

भविष्यासाठी जास्तीत जास्त बचत करा

2023 सालात बचतीमध्ये कशी वाढ करणार आहात? तुमची खरेदी मर्यादित ठेवणार आहात का? हॉटेलमध्ये जाणे थांबवणार का? विश्वास ठेवा तुम्हाला स्वतःचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी वरील गोष्टी थांबवण्याची गरज नाही. आयुर्विमा असो किंवा सर्वसाधारण विमा, तो नेहमीच तुमच्यासोबत असतो. कारण जीवन अनिश्चित आहे. काही चुकीचे होण्याची  काळजी करणे व्यर्थ आहे. तुमच्या जीवनात वाईट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही सर्वोत्तम योजना बनवा. जीवन विमा किंवा आरोग्य विमा खरेदी करून तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करा. शिवाय तुमच्या कमाईतून वेगळा निधी बाजूला काढून ठेवा. कारण कायम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी  दरवर्षी एक निश्चित रक्कम तुम्हाला अधिक बचत करण्यात मदत करेल.

मोटारीच्या विम्याचे वेळेवर नूतनीकरण करा

कल्पना करा की, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहात. ट्रफिक पोलीस तुम्हाला जाताना रस्त्यात थांबवतो. दुर्दैवाने तुमच्याकडे वैध कार विमा नाही. पोलिसांसमोर तुम्ही उभे आहात आणि तो तुमच्याकडे कागदपत्रे मागत आहे. तुमच्या विमा सल्लागाराने संपलेल्या कार विम्याचे नूतनीकरण करण्याची तुम्हाला वारंवार आठवण करून देऊनही तुम्ही दुर्लक्ष केले.

विम्याशिवाय वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तुमच्या मालकीच्या मौल्यवान गाडीसाठी स्वतःला जबाबदार बनवा. कार विम्याचे वेळेवर नूतनीकरण करा

ध्येयांनी भरलेल्या वर्षाची सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारचे संकल्प सोडणे.. सर्व पूर्ण करता आले नाही तरी हरकत नाही. पण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या संकल्पांच्या यादीमध्ये विमा समाविष्ट करण्याचा विचार करा. कारण ही केवळ चांगली कल्पना नाही तर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक बॅकअप योजनादेखील आहे.