आजपासून पुन्हा पाच दिवस मुसळधार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rain-12

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या आठवडय़ात शनिवारपासून सलग चार दिवस जोरदार बरसल्यानंतर पावसाने दोन दिवस उसंत घेतली. मात्र उद्या १३ जुलैपासुन पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असून १९ जुलैपर्यंत मुंबईसह कोकणात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पाच दिवसांत राज्यभरातही अनेक भागांत मुसळधार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, १९ तारखेनंतर पाऊस ब्रेक घेईल असे सांगण्यात आले आहे.

…म्हणून पाऊस पुन्हा सक्रिय होणार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते आणखी गडद झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून उद्यापासुन मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. दरम्यान, दक्षिण गुजरातवरही प्रतिचक्रवाती वाऱयांचा प्रभाव असल्याने कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

– गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
– अरबी समुद्रात ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार.
– मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा