आंतर रुग्णालय क्रिकेटः केडीए हॉस्पिटल विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे व क्रीडा संघटक गोविंदराव मोहिते गौरवार्थ आयडियल आंतर हॉस्पिटल टी-20 ‘अ’ विभाग क्रिकेट स्पर्धेमध्ये कोकिलाबेन धीरूभाई अंबानी-केडीए हॉस्पिटल संघाने विजेतेपद पटकावले.

आयडियल स्पोर्ट्स ऍकॅडमीतर्फे ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या सहकार्याने झालेल्या स्पर्धेत अष्टपैलू प्रतीक घरत, जयेश भुंगावले, अलकेत तांडेल यांच्या खेळामुळे केडीए हॉस्पिटलने सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा 32 धावांनी पराभव करून ‘अ’ विभाग विजेतेपदाला गवसणी घातली. डॉ. हर्षद जाधव, कृपाल पटेल यांनी पराभव टाळण्यासाठी शर्थीची झुंज देऊनही सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रीडाप्रेमी गोविंदराव मोहिते, क्रीडा संघटक ओमकार मालडीकर, प्रशिक्षक दीपक पाटील, क्रीडाप्रेमी राजन लाड, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू प्रतीक घरत, उत्कृष्ट फलंदाज अलकेत तांडेल तर उत्कृष्ट गोलंदाज कृपाल पटेल ठरला.

कोरोनाकाळात सेवाभावी कार्य करणाऱयांचा सन्मान

पारितोषिक वितरण सोहळय़ात क्रीडा क्षेत्रासह कोरोना प्रादुर्भाव काळामधील सेवाभावी कार्याच्या गौरवार्थ रुग्णालयीन नामवंत क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव, डॉ. स्वप्नील निसाळ, डॉ. परमेश्वर मुंडे, डॉ. मनोज यादव, डॉ. राज मुखी, डॉ. एस. एच. जाफरी, डॉ. निहारिका राउळ, मेट्रन  वृषाली कांबळी, क्रिकेटपटू दीपक पाटील, शामसुंदर राऊळ, निरंजन जाना, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रशांत केणी, सुहास जोशी, राजेश दळवी, नवनाथ दांडेकर, अभिजित ओव्हाळ, महेश पांचाळ, सुनील सकपाळ, यशोदत्त पटेकर, राकेश खेडेकर आदी टॉप-20 मान्यवरांचा सन्मान ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटतर्फे करण्यात आला.