
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात टर्मिनल 2 हे देशातील सर्वात जास्त उड्डाणं होणाऱ्या विमानतळांपैकी एक आहे. देशातंर्गत काही विमानं देखील या विमानतळावरून उडतात. पण, गुरुवारी या विमानतळाचा सर्व्हर डाऊन झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला विमानतळाचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे अनेक विमान कंपन्यांच्या काउंटर समोर प्रवाशांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विमानातील प्रवाशांचं सामान चढवणे, त्यांना बोर्डिंग पास काढून देणे इत्यादी महत्त्वाची कामं रखडली आहेत.





























































