इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील 60 ठार

इस्रायलने आंतरराष्ट्रीय दबावानंतर गाझाला पुन्हा अन्नपुरवठा सुरू केला असला तरी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. गेल्या 24 तासांत ताज्या हल्ल्यांमध्ये 60 लोक ठार झाले. गाझामधील लोकांवर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटामुळे इस्रायलला जगभरातून टीकेचा सामना करावा लागत आहे.