चाळीतल्या दिवाळीची बातच न्यारी – स्वप्नील जोशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील जोशी, अभिनेता

दिवाळी म्हटलं की सर्वांनाच आपल्या बालपणीच्या आठवणीत रमायला आवडतं. चाळसंस्कृतीतून टॉवर संस्कृतीत येऊन दोन दशकं झाली. तरीही गिरगावातल्या चाळीतील दिवाळीच्या आठवणी आजही मला सुखावतात. मजल्यावरील 24 खोल्यांना एकसारखा कंदील, चार चाळींचा मिळून पटांगणाच्या मधोमध एक भव्य कंदिल असायचा. आजूबाजूच्या काकी-मावशी एकत्र मिळून फराळ तयार करायच्या. तो फराळ सर्वांना वाटला जायचा. अगदी फटाक्यांचं देखील एकमेकांना शेअरिंग व्हायचं. त्यामुळं खऱया अर्थानं दिवाळी ही सर्वांची वाटायची.

दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठून आई तेल आणि उटणं लावून मला अंघोळ घालायची. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राम मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. मगच फराळाला हात लावायचा असा आमच्या घरात अलिखित नियमचं असायचा.आदल्या रात्रीच हळूच मी चिवडा- करंजी लंपास करायचो. आईनं देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्हाला फराळावर मनसोक्त ताव मारायचो. त्यानंतर जे गायब व्हायचो ते रात्रीचं सगळे फटाके संपल्यावर घरी यायचो. दुपारी कुणाकडे जेवतोय, संध्याकाळी कुणाकडे फराळ करतोय हे घरातल्यांनाही माहित नसायचं. सगळीचं घर आपली होती. इतकं सुरक्षित वातावरण चाळीत असायचं. तेक्हा लोकांची घर छोटी होती, पण मनं मोठी होती. आता अलिशान गाडय़ा आल्या, हके तेकढे फटाके, महागातले कपडे आपण विकत घेऊ शकतो. मित्रमंडळींना दिवाळीची मोठी पार्टी देऊ शकतो. परंतु गिरगाकातल्या चाळीतील दिकाळीची सर कशालाच येणार नाही.

कोरोनाच्या संकटामुळं आपल्या सर्वांचीच दिवाळी यंदा काहीशी वेगळी आहे. आपले सण-उत्सव जोरदार साजरे व्हायलाच हवे, पण यंदा सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन करूनच आपण या सणाचा आनंद लुटला पाहिजे. चांगल्या आरोग्यापेक्षा कोणताही मोठा सण नाही. त्यामुळं आपल्यासह इतरांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. प्रदूषणमुक्त सण साजरा करण्यावर माझा नेहमीच भर असतो. गेल्या आठ वर्षांपासून मी आवाजाचे फटाके फोडत नाही. प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. नाहीतर प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईची ‘दिल्ली’ व्हायला वेळ लागणार नाही. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. जगावर पसरलेला कोरोनारूपी अंधःकार लवकरच दूर होईल, अशी यानिमित्ताने मी प्रार्थना करतो. सर्वांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची आणि उत्तम आरोग्याची जाको. लव यू ऑल !!!