स्वागत दिवाळी अंकांचे

128

साहित्य संगम

‘लक्ष्य 2019’, ‘भारतीय अर्थव्यवस्था सशक्त की अशक्त’ आणि ‘प्रतिमेमागचा मी’ हे विशेष परिसंवाद या दिवाळी अंकाचे बलस्थान ठरले आहेत. याकरिता अविनाश धर्माधिकारी, जयदेव डोळे, डॉ. भालचंद्र कानगो, डॉ. विनायक गोविलकर, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संतोष घारे, जॉन गोन्सालवीस, विश्वास उटगी, देवेंद्र फडणवीस, डॉ. श्रीराम लागू, ऍड. उज्ज्वल निकम, प्रसन्न जोशी आदी मान्यवरांनी लिखाण केले आहे. याशिवाय कवितेच्या राजधानीत साहित्य सफर (उमाकांत वाघ), अनुवादाचं जग (कविता महाजन), मी टू (गीता राऊत), लोकगुरू कबिराची कालातीत प्रज्ञादृष्टी (डॉ. कीर्ती पिंजरकर) हे विशेष उल्लेखणीय लेख आहेत. 

संपादक : उमाकांत वाघ

पृष्ठे : 152

मूल्य : 150 रुपये

 

pratibibप्रतिबिंब

सगळ्यांच्या सर्वसामान्य जगण्याला व्यापून टाकणार्‍या ‘ऍप’ या सर्वव्यापी अवताराची दखल घेणारे मंदार काळे, प्रकाश परांजपे, यांचे लेख विचारप्रवृत्त करणारे आहेत. याशिवाय मार्क्सवादाचा देशी आविष्कार- समीर अमीन (डॉ. समीर अमीन), शेतीचा विकास, शहरांची उन्नती (राजेंद्र जाधव), प्लॅस्टिक-प्रदूषण आणि पर्यावरण (शशिकांत काळे), कौटुंबिक न्यायालय (भूपाली वझे) हे माहितीपर लेख आहेत. प्रत्येकाकडे स्त्री वा पुरुष म्हणून नव्हे तर माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असावा. ‘मी टू… आधी, आता आणि नंतर’ या लेखात प्रज्ञा जांभेकरांनी सजगपणे केलेला हा उहापोह वाचनीय आहे. याव्यतिरिक्त इरावती कर्णिक, हृषीकेश गुप्ते, रांगणेकर यांच्या कथा तसेच मान्यवरांच्या कवितांचा समावेश या अंकात केला आहे. मुखपृष्ठ अंकातील विषयांना साजेसे!

संपादक : हेमंत कर्णिक

पृष्ठे : 219

मूल्य : 200 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या