IPL 2020 – मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने नोंदवला नकोसा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना रंगला. या लढतीत मुंबईने दिल्लीचा 57 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

मुंबईच्या विजयात क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी मोलाचे योगदान दिले. मात्र कर्णधार रोहित शर्मा खातेही उघडता आले नाही. आर. अश्विनच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. यासह त्याच्या नावावर एक नकोस विक्रम जमा झाला.

रोहित शर्मा आयपीएल कारकिर्दीत 194 डावात 13 वेळा शून्यावर बाद झाला आहे. आयपीएल मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहे. रोहित व्यतिरिक्त हरभजन सिंह 88 डावात, पार्थिव पटेल 137 आणि अजिंक्य रहाणे 139 डावात 13 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

IPL 2020 – दिल्लीने ज्याला सोडला, त्यानेच कणा मोडला; तिन्ही लढतीत ‘बोल्ट फॅक्टर’ ठरला महत्वाचा

धारधार गोलंदाजीपुढे दिल्ली फुस्स

मुंबईने निर्धारित 20 षटकात 200 धावा उभारल्यानंतर दिल्लीची फलंदाजी मुंबईच्या धारधार गोलंदाजीपुढे फुस्स झाली. सुरुवातीचे तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. स्टोयनिस आणि अक्षर पटेलने थोडी झुंज दिल्याने दिल्लीला 8 बाद 143 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबई कडून बुमराहने सर्वाधिक 4, तर ट्रेंट बोल्टने 2 बळी घेतले.