
यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेतील प्ले ऑफचे संघ अखेरच्या लढतीत पक्के झाले. 56 व्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने मुंबई इंडियन्सचा 10 विकेट्सने दारुण पराभव करत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. या परभवामुळे मुंबईला काहीही फरक पडला नसला तरी कोलकाता नाईट रायडर्सचे मात्र ‘पॅकअप’ झाले आहे.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 149 धावा केल्या. हे आव्हान सनरायझर्स हैद्राबादने एकही गडी न गमावता 17.1 षटकात विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरने नाबाद 85 आणि ऋद्धिमान साहाने नाबाद 58 धावा केल्या.
सलग तिसरा विजय
सनरायझर्स हैद्राबादने अखेरच्या तिन्ही लढतीत विजय मिळवत प्ले ऑफचे तिकीट मिळवले. हैद्राबादचे 16 लढतीत 14 गुण झाले. दुसरीकडे केकेआरचे देखील 14 गुण झाले होते. मात्र नेटरनरेट मध्ये बाजी मारत हैद्राबादने अंतिम 4 संघात स्थान मिळवले.
4 संघ प्ले ऑफमध्ये, 4 बाहेर
दरम्यान, आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स (18), दिल्ली कॅपिटल्स (16), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (14) आणि सनरायझर्स हैद्राबाद (14) हे संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाले आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांनी गाशा गुंडाळला.
क्वालिफायर-1
5 नोव्हेंबर, 2020 (दुबई)
टीम -1 मुंबई इंडियन्स (MI) vs टीम -2 दिल्ली कॅपिटल्स (DC)
एलिमिनेटर
6 नोव्हेंबर, 2020 – अबु धाबी
टीम -3 सनराइजर्स हैद्राबाद (SRH) vs टीम – 4 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
क्वालिफायर – 2
8 नोव्हेंबर, 2020 -अबु धाबी
एलिमिनेटर लढतीतील विजेता संघ vs क्वालिफायर -1 मधील पराभूत संघ
फायनल
10 नोव्हेंबर, 2020 – दुबई
क्वालिफायर -1 आणि 2 मधील विजेता संघ
























































