IPL 2021 सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, मुख्य खेळाडू स्पर्धेतून बाहेर

आयपीएलच्या 14 व्या हंगामात तीन पराभवानंतर विजयी ट्रॅकवर आलेल्या सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. हैदराबादचा मुख्य गोलंदाज टी. नटराजन स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. नटराजन याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असल्याने तो आगामी काळात स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.

टी. नटराजन याने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सुरुवातीचे दोन सामने खेळले होते. यानंतर झालेल्या दोन्ही लढतीत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आता तर तो स्पर्धेतूनच बाहेर फेकला गेला आहे. सध्या तो संघासोबत चेन्नईत सुरू येथून तो बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये जाईल.

याआधी ऑस्ट्रेलियातील दौरा संपल्यानंतर नटराजन दोन महिने बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये होता. दुखापतीमुळे तो इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतही खेळू शकला नव्हता.

सनरायझर्सला धक्का

दरम्यान, टी. नटराजन याने गेल्या हंगामामध्ये दमदार कामगिरी करत एक उत्कृष्ट यॉर्कर गोलंदाज म्हणून नावारुपाला आला होता. यूएईमध्ये झालेल्या आयपीएल 2020 मध्ये नटराजन याने 16 लढतीत 16 बळी घेतले होते. तसेच डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजांना जखडून ठेवण्याचे कामही केले होते. या कामगिरीमुळे त्याची टीम इंडियामध्येही निवड झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या