IPL 2026 ची फायनल संपताच घरी परतताना माजी खेळाडूचा भीषण अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2026 चा किताब सलग दुसऱ्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने उंचावला. मात्र, फायलचा थरार संपुष्टात आल्यानंतर मायदेशी परतताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क एका भीषण रस्ते अपघातातून थोडक्यात बचावला आहे. समालोचन पॅनेलचा भाग असलेला 45 वर्षीय क्लार्क विमानाने घरी जाण्यासाठी विमानतळाकडे निघाला होता, तेव्हा त्याची कार एका मोठ्या सेमी-ट्रेलर ट्रकच्या खाली घुसली. अपघाताच्या वेळी क्लार्क गाडीत मागच्या सीटवर झोपला होता आणि अचानक झालेल्या जोरदार धडकेमुळे त्याला जाग आली. या थरारक अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली नाही, अशी प्रतिक्रिया त्याने नंतर एका पॉडकास्टवर दिली.

क्लार्कने दिलेल्या माहितीनुसार, समोर चालणाऱ्या ट्रकचे ब्रेक लाईट्स बंद असल्यामुळे त्याच्या चालकाला अंदाज आला नाही आणि कार थेट ट्रकच्या मागच्या भागात जाऊन धडकली. या अपघातात क्लार्कची कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. स्वतः क्लार्कला किरकोळ दुखाप झाली होत, तरी कार चालकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. अपघात घडल्यानंतर चालक प्रचंड घाबरला होता, कारण ती कार त्याची स्वतःची नसून एका कंपनीची होती. क्लार्कने त्याला तात्काळ वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला आणि स्थानिक रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. TOI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

फुटबॉलच्या महायुद्धात हिंदुस्थानी वंशाची फौज

या संकटसमयी स्थानिक हिंदुस्थानी नागरिक आणि BCCI ने केलेल्या मदतीबद्दल मायकल क्लार्कने मनापासून आभार मानले आहेत. स्थानिक लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, तर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने फोन करून क्लार्क आणि जखमी चालक दोघांच्याही तब्येतीची विचारपूस केली. हा एक दुर्दैवी अपघात होता आणि हिंदुस्थानात आपल्याला मिळालेल्या चांगल्या लोकांमुळेच आपण सुखरूप घरी पोहोचू शकलो, अशा भावना क्लार्कने व्यक्त केल्या. या संपूर्ण अपघाताच्या धक्क्यातून सावरत क्लार्क अखेर आपल्या विमानाने ऑस्ट्रेलियाला सुरक्षितपणे रवाना झाला.