
सामना ऑनलाईन । मुंबई
न्युरोएन्डोक्राइन टय़ुमरवर गेले वर्षभर लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर काल बहुआयामी अभिनेता इरफान खान मुंबईत परतला. यावेळी त्याने रसिकांचे पुन्हा मनापासून आभार मानले. ‘रसिकांच्या प्रेमामुळेच माझा हा खडतर प्रवास सुकर झाला आणि मी पुन्हा तुमच्यापर्यंत येऊ शकलो, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
2018मध्ये त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याला दुर्धर अशा न्युरोएन्डोक्राइन टय़ुमरने ग्रासले हेते. सुरुवातीला अत्यंत भावूक पोस्ट त्याने सोशल मीडियावर टाकली होती. ‘एखाद्या प्रवासाला तुम्ही निघता आणि मध्येच प्रवासात तुम्हाला उतरायला सांगितले जाते. माझीही अवस्था अशीच झाली आहे.’, असे त्याने म्हटले होते. मात्र, वर्षभर उपचारानंतर तो पूर्ण बरा झाला आहे. सोशल मीडियावर व्यक्त होताना तो म्हणाला, ‘विजयाच्या मागे धावता धावता कुठेतरी प्रेमाचे महत्त्व विसरून जातो. पण आपण प्रचंड असुरक्षित असतो तेव्हा आपल्याला याच प्रेमाची पुन्हा आठवण होते.’

























































