
टीम इंडियाचा विकेट कीपर इशान किशन हा येत्या 26 डिसेंबर पासून दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. काही खासगी कारणास्तव इशान किशनने त्याने मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे.
🚨 UPDATE 🚨: Ishan Kishan withdrawn from #TeamIndia’s Test squad. KS Bharat named as replacement. #SAvIND
Details 🔽https://t.co/KqldTEeD0T
— BCCI (@BCCI) December 17, 2023
इशान किशन याने याबाबत बीसीसीआयला कळवले असून त्याच्या जागी के. एस भारत याची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केलेली आहे. याआधी टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला दुखापत झाल्याने या मालिकेतून बाहेर पडला आहे.




























































