इसिसचा म्होरक्या अबुअल बगदादीचा मुलगा सिरियात ठार : सूत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,

इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबु बकर अल बगदाची याचा मुलगा हुदायफाह अल सिरियाच्या होम्स प्रांतात जिहादींच्या हल्ल्यात ठार झाला आहे. आयएसच्या प्रोपागंडा विभागाच्या अमाक या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार होम्स भागात थर्मल पॉवर स्टेशनवर नुसायरियाह आणि रशियाच्या विरोधात चाललेल्या कारवाईत अल बद्री ठार झाला आहे.

इसिसप्रमुख बशर अल-असद अलावैत धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी नुसायरिह हा शब्द वापरतात. इसिसने २०१४ मध्ये इराकमधील अनेक भागांवर हल्ला करून सिरिया आणि इराकमध्ये स्वतःला खलिफा म्हणून घोषित केले होते. तेव्हापासून सिरिया आणि इराकच्या सैन्याने दहशतवाद्यांविरोधात जिहादींना मोठ्या प्रमाणात कंठस्नान घातले.

गेल्या वर्षी इराक सरकारने इसिसला हरवल्याचे जाहीर केले होते. पण इराकचे सैन्य वाळवंटी भागात दहशताविरोधात कारवाई करत आहे. इराकच्या एका गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याने माहिती दिली की मे महिन्यात अबु बकर ला अनेक ठिकाणी मृत घोषित केले आहे पण तो अजूनही जिवंत असून तो सध्य सिरियात वास्तव्यास आहे. बगदादीला जगातला मोस्ट वॉन्टेड व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेने त्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीसही जाहीर केले आहे.