इस्राएलचा पॅलेस्टाईन दहशतवाद्यांवर ‘एअर स्ट्राईक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जेरुसलेम

इस्राएलने पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवदी संघटनेवर हल्ला केला आहे. इस्राएलने रॉकेटच्या माध्यमातू हा हल्ला केला असून यात किती दहशतवादी मारले याचा आकडा अजून समोर आलेला नाही.

ज्यावेळी इस्राएलने दहशतवाद्यांवर ही कारवाई केली तेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांच्या भेटीला गेले होते. इस्राईलने केलेल्या कारवाईची ट्रम्प यांनी पाठराखण केली असून इस्राएला स्वरक्षणाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी सोमवारी पॅलेस्टाईनने तेल अवीव या इस्राईलच्या प्रमुख शहरावर रॉकेट हल्ला केला होता, त्यात 7 जण जखमी झाले होते.

tel-aviv

गाझाच्या सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार इस्राईलने अनेक ठिकाणी हल्ले केले. त्यात गाझा शहरातील एक इमारत पूर्ण नेस्तनाबूत झाली. ही इमारत हमास या दहशतवादी संघटनेची होती असा दावा इस्राईलने केला आहे. हमास संघटनेचा म्होरक्या इस्माईल हानियाने म्हटले की इस्राएलने जर आमच्यावर हल्ला केला तर त्याचे चांगलेच प्रत्युत्तर दिले जाईल.

attack-on-gaza

पॅलेस्टाईनने सोमवारी पहाटे 5.20 मिनिटांनी तेल अवीवर रॉकेट हल्ला केला. हे रॉकेट रहिवासी भागात पडला. पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी इस्राएलच्या मुख्य शहारव हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. या हल्ल्याचे योग्य प्रत्युत्तर दिले जाईल असे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले होते.

एक आठवड्यापूर्वी गाजाहून तेल अवीवर दोन रॉकेट सोडण्यात आले होते. सुदैवाने यात कुठलीही जिवीतवाहानी झाली नाही. परंतु प्रत्युत्तरादाखल इस्राएलने सहा हून अधिक रॉकेट गाझामध्ये सोडले, यात चारजण जखमी झाले होते.