इस्रोचे हॅपी न्यू इयर! एक्स्पोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रोने नवीन वर्षाची सुरुवात दमदार केली आहे. नवीन वर्षाचे स्वागत एक्स्पोसॅट या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून केले. सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात झेपावला. पृथ्वीपासून सुमारे 650 किलोमीटर उंचीवर एक्स्पोसॅट हा 469 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.

या एक्स्पोसॅटवर Polarimeter Einstrument in X-Rays (Polix) आणि X-Rays Spectroscopy and Timng (XSPECT) स्पेक्ट्रोस्कॉपी अशी दोन उपकरणे बसवण्यात आली आहे. उपकरणांच्या माध्यमातून क्ष किरणांचे उगम स्रोत आणि कृष्ण विवर तसेच न्यूट्रॉन तारे यांचे सखोल निरीक्षण करण्यात येईल.