
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून देशपातळीवर शानदार कामगिरी बजावली होती. राज्य शासनाला आता त्यांच्या नावाचा विसर पडला असून त्यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेली आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना गुंडाळून यासारखीच दुसरी योजना सुरू करण्यात येत आहे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमत्री स्व. आर. आर. पाटील (आबा) यांनी ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून देशपातळीवर शानदार कामगिरी बजावली होती. त्यांनी सुरु केलेल्या योजना राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आल्या. ग्रामविकासाच्या दृष्टीने चिरस्थायी विकासाचे काम त्यांच्या काळात झाले. पण राज्य…
— Supriya Sule (@supriya_sule) October 7, 2025
याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमत्री आर. आर. पाटील (आबा) यांनी ग्रामविकास खात्याचे मंत्री म्हणून देशपातळीवर शानदार कामगिरी बजावली होती. त्यांनी सुरु केलेल्या योजना राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आल्या. ग्रामविकासाच्या दृष्टीने चिरस्थायी विकासाचे काम त्यांच्या काळात झाले. पण राज्य शासनाला आता त्यांच्या नावाचा विसर पडला असून त्यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेली आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. याऐवजी शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही योजना सुरु केली आहे. दोन्ही योजनांचा हेतू समान असल्याचे कारण देत आबांचे नाव असणारी योजना बंद करण्यात येतेय. जर दोन्ही योजनांचा हेतू समान आहे तर ज्या नेत्याने राज्याचे नाव देशभरात उंचावले,ग्रामविकासाला नवे आयाम दिले त्या नेत्याचे नाव या योजनेच्या नावातून काढणे खेदजनक आहे. महाराष्ट्राने आपल्या सुपुत्रांचा नेहमीच सन्मान केला आहे, विद्यमान शासनाने चुकीचे पायंडे पाडण्याचा प्रयत्न करु नये, ही विनंती, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.