झारखंड- मतदानादरम्यान नक्षलवाद्यांनी पूल उडवला

424

झारखंडमध्ये विधानसभेच्या पहील्या टप्प्याच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू असून यादरम्यान नक्षलवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. येथील गुमला जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा क्षेत्रात नक्षलवाद्यांनी एक पूल उडवला आहे. अद्याप यात कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, या हल्ल्याचा कुठलाही परिणाम मतदानावर झाला नसल्याचे उपायुक्त शशी रंजन यांनी सांगितले आहे. हल्ल्यानंतर याभागात जोरदार शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.

या निवडणुकांना नक्षलवाद्यांचा विरोध असून मतदान बंद पाडण्याचा त्यांचा मनसुबा आहे. याचपार्श्वभूमीवर गुमला जिल्ह्यातील विष्णुपूर विधानसभा क्षेत्रात नक्षलवाद्यांनी एक पूल उडवला. पूल उडवल्यामुळे मतदारांमध्ये दहशत पसरेल व ते मतदानासाठी घराबाहेर पडणार नाहीत हा नक्षलवाद्यांचा हेतू होता. पण मतदार नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता मतदान करत आहेत. दरम्यान, झारखंडमधील सहा नक्षलप्रभावित जिल्ह्यातील 13 विधानसभा जागांसाठी 37,83,055 मतदारांच्या हातात 189  उमेदवारांचे भविष्य आहे. नक्षलप्रभावित भाग असल्याने येथे मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत आहे.

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या