मुलींच्या व्हर्जिनिटीबाबत वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

व्हर्जिन मुली या सीलबंद बाटलीसारख्या असतात अशी वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकणाऱ्या प्रोफेसरवर विद्यापीठाने कारवाई केली आहे. जादवपूर विद्यापीठाने प्रोफेसर कनक सरकार यांच्यावर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.

जादवपूर विद्यापीठाने प्रोफेसर कनक सरकार ‘तुम्हाला माहिती आहे का कोल्डड्रिन्कची बाटली किंवा बिस्किटाचा पुडा खरेदी करताना सील तुटलेले असेल तर तुम्ही खरेदी करता का? एका मुलीला जन्मापासून बायोलॉजिकली सील असते आणि जोपर्यंत ती तूटत नाही. व्हर्जिन मुलीमध्ये खूप काही गोष्टी असता, जसे की सुसंस्कृतपणा व लैंगिक स्वच्छता’, अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. यावर वाद उफाळून आल्यानंतर याची महिला आयोगाने दखल घेतली होती आणि विद्यापीठाकडे व पोलिसांकडे यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच महिला आयोगाचे एक पथक विद्यापीठाच्या उपकुलपतींची भेट घेणार होत्या.

वाचा संपूर्ण बातमी – व्हर्जिन मुली म्हणजे सील बंद बाटली, विद्यापीठाच्या प्रोफेसरची वादग्रस्त पोस्ट