६ व्या जागतिक मराठी संमेलनाला ४ जानेवारीपासून प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित १६ व्या जागतिक मराठी संमेलनाला उद्या शुक्रवार, ४ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. “शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवरील संमेलनाचे उद्घाटन उद्या दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहिल. अमेरिकास्थित मराठी उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार संमेलनाचे अध्यक्ष आहेत. उद्घाटनानंतर रामदास फुटाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे.

४ ते ६ जानेवारी असे तीन दिवस चालणाऱ्या संमेलनात परदेशात प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मराठी माणसांच्या कतृत्वाचा परिचय या संमेलनातून करण्यात येणार आहे. या संमेलनात २० च्यावर विविध देशातील मराठी बांधवांना आमंत्रित करण्यात आले आहे. संमेलनाच्या तीन दिवसात नितीन गडकरी, संजय नहार, महिला उद्योजिका कल्पना सरोज, नाटककार महेश एलकुंचवार, हनुमंत गायकवाड, डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे आदींच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. रविवार, ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप होईल.