जालना हादरलं! दरोडेखोरांचा पावणे दोन लाखांच्या रक्कमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलीने आपल्या वडिलांच्या आजारपणासाठी घरात ठेवलेल्या पावणे दोन लाखांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर दरोडेखोरांनी डल्ला मारला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे 13 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

वडीगोद्री येथील अंगणवाडी सेविका शिवकन्या शहादेव गिरी या मुलगी आजारी असल्याने तिला मुंबईला भेटण्यासाठी गेल्या होत्या. ही संधी साधत दरोडेखोरांनी घरात घुसून कपाटातील 1 लाख हजार रुपये रोख रक्कम व एक सोन्याचा ओम व कानातले असा 2 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घराच्या कड्या लावून घेतल्या.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच गोंदी पोलीस श्वान पथक व ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र अद्यापही चोरीबाबत गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. या चोरीमुळे वडीगोद्री परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

चोर सीसीटीव्हीत कैद

राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात सहा तरुण हातात काठ्या, तलवारी घेऊन जाताना कैद
झाले आहेत. यातील दोघांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. खुलेआम हातात शस्त्रे घेवून दरोडेखोर गावात फिरत असल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.