
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने शोपियान येथे छापे टाकले जात आहेत. एनआयए, पोलीस आणि सीआरपीएफने शोपियानमधील दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. शोपियानच्या इमाम साहिब येथील सिराज -उल-उलूमवर छापा टाकला. या शाळेवर अलीकडेच प्रशासनाने यूएपीए अंतर्गत कारवाई केली होती.
कश्मीर प्रशासनाने दारुल उलूम जामिया सिराज-उल-उलूम शाळेला बेकायदेशीर संस्था म्हणून घोषित केले होते. या संस्थेवर दहशतवादी निधी पुरवल्याचा आणि तिच्या काही सदस्यांचे प्रतिबंधित संघटनांशी संबंध असल्याचा आरोप होता. दरम्यान, शोपियानमधील एका घरात कारवाई सुरू केल्याचे समजते. असे वृत्त अमर उजालाने दिले आहे.































































