शाळेची पायरीही न चढता ती झाली दहावी पास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

दहावीच्या परीक्षेचा शनिवारी निकाल जाहीर झाला आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 77.10 टक्के इतकी आहे. पण, या निकालात एका विद्यार्थिनीने कमाल करून दाखवली आहे. दहावीपर्यंत शाळेची पायरीही न चढलेल्या कोल्हापूरच्या जान्हवी देशपांडे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत तब्बल 84 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

जान्हवी 17 नंबर फॉर्म भरून परीक्षेला बसली झाली होती. एका बाजूला शाळेसाठी आणि खाजगी क्लाससाठी भरमसाठ फी भरून मुलांचे अॅडमिशन सुरू असताना दुसऱ्या बाजूला शाळेत न जाताही यश मिळू शकतं, हे जान्हवीने दाखवून दिलं आहे. टुरिझम व्यवसायिक आणि सॉफ्टवेअर इंजिनियर   असणाऱ्या जानव्हीच्या आई वडिलांनी हे सगळं टाळत तिचा घरीच अभ्यास घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा विश्वास तिने सार्थ करून दाखवत राज्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.