अबब… 52 वर्षांचा व्यावसायिक फुटबॉलपटू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
japan-52-kazuyoshi

सामना ऑनलाईन । टोकिया

जपानचा 52 वर्षीय काजूयोशी मियुरा हा फुटबॉलपटू व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये आपल्या पायाची जादू दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. योकोहामा एफसी संघाने त्याला करारबद्ध केले असून तो फुटबॉल विश्वातील सर्वांत वयस्क खेळाडू होय, हे विशेष.

काजूयोशीचा हा कारकिर्दीतील 34वा सिझन होय. त्याने दोन वर्षांपूर्वी अखेरचा व्यावसायिक फुटबॉल सामना खेळला होता. जपान संघासाठीही त्याने 89 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत. काजूयोशी योकोहामा फुटबॉल क्लबकडून घरच्या मैदानावर जीफू एफसीविरुद्ध 54 मिनिटे खेळला. हा सामना योकोहामा एफसीने 2-0 गोलफरकाने जिंकला. काजूयोशीने 1986मध्ये वयाच्या 19व्या वर्षी ब्राझिलमधील क्लब सांतोसकडून फुटबॉलचा श्रीगणेशा केला होता. 1990मध्ये जपानमध्ये परतल्यानंतर त्याने स्थानिक लीगमध्ये खेळायला सुरुवात केली होती.