
फ्रान्स येथे धर्माच्या नावाखाली झालेल्या हत्यांचा हिंदुस्थानातील कलावंत, विचारवंतांनी तीव्र निषेध केला आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह, गीतकार जावेद अख्तर, वरिष्ठ नृत्यांगना मल्लिका साराभाई, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण, माजी पोलीस अधिकारी जुलियो रिबेरो आदींचा समावेश आहे. या सर्वांनी हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्य़ा काही मुस्लीम धर्मगुरू आणि नेत्यांच्या वक्तव्यांची कडक शब्दांत निंदादेखील केली आहे.
कलावंत, विचारवंत, आणि विविध क्षेत्रांतील सुमारे 100 हून अधिक मान्यवरांनी निषेधाच्या निवदेनावर स्वाक्षऱ्य़ा केल्या आहेत. निवेदनाद्वारे फ्रान्समधील ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ला तर्पसंगत ठरवणाऱ्य़ा हिंदुस्थानातील मुस्लिमांच्या स्वयंघोषित पालनकर्त्यांवर जोरदार टिकास्त्र सोडण्यात आले आहे.
एखाद्या गुह्याला योग्य ठरवताना त्याच पद्धतीच्या दुसऱ्य़ा गुह्याशी त्याची तुलना करणे, हे तर्पसंगत नाही. अशा आशयाची वक्तव्ये हास्यास्पद असतात. दोन चुकीच्या गोष्टी एकत्र येऊन बरोबर होऊ शकत नाही. आम्ही धर्माच्या नावावर हिंसेचा निषेध करतो. कोणत्याही देवता, संत वा प्रेषित हत्येचे समर्थन करायची शिकवण देत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
फ्रान्समध्ये नुकतेच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांना ठार करण्यात आले. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी याला इस्लामी दहशतवादी हल्ला असे म्हटले होते.
























































