
उदय जोशी । बीड
रोजगार हमी योजनामंत्री जयदत्त क्षीरसागर गुरुवारी मतदार संघातील चौसाला येथील उपकेंद्राचा शुभारंभ करून मतदार संघातील चार पंचायत समिती गणात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांनी बीड मतदार संघात आणखी जोमानं काम करण्यास सुरुवात केली आहे.
24 वर्षांनंतर बीड जिल्ह्याला जयदत्त क्षीरसागराच्या माध्यमातून शिवसेनेचे मंत्री लाभले आहेत. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे. एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असून विकासासोबत पक्ष संघटना वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. आज चौसाला येथील सबस्टेशनचा शुभारंभ करून ते ग्रामीण भाग पिंजून काढणार आहेत. या कार्यक्रमानंतर पंचायत समिती गणामध्ये कार्यकर्ता मेळावा घेत आहेत.






























































