
आयआयटी, एनआयटीसह अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या चार दिवस आधीच वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. 27 जानेवारी रोजी होणारी परीक्षा आता 28 जानेवारी रोजी होणार आहे.
एनटीएने अगोदर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी होणार होती. आता त्याऐवजी परीक्षा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 24, 25, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत परीक्षा होणार आहे. 27 जानेवारीला कोणतीही परीक्षा होणार नाही. परीक्षा सुरू होण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जेईई मुख्य पेपर-1 परीक्षा दोन शिफ्टमध्ये बीई आणि बीटेकसाठी घेतली जाईल. याशिवाय बीआर्च आणि बी प्लॅनिंग म्हणजेच जेईई मेन पेपर-2ची परीक्षा 28 जानेवारीला दुसऱया शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे.


























































