झारखंड विधानसभा निवडणूक 2019: दुसर्‍या टप्प्यात 64 टक्के मतदान

596

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले आहे. या टप्प्यात राज्यातील 20 विधानसभेच्या जागांवर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 64.39 टक्के विक्रमी मतदान झाले आहे. हिंसाचाराची एक घटना वगळता इतर सर्व जागांवर शांततेत मतदान झाले आहे. मात्र निवडणुकीदरम्यान कर्तव्यावर असलेले 44 वर्षीय सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र गिरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच वेळी गुमला जिल्ह्यातील सिसई विधानसभा मतदार संघातील बागणी बूथवर पोलिसांच्या गोळीबारात एक ग्रामस्थ ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. दुसर्‍या टप्प्यात एकूण 260 उमेदवार रिंगणात आहेत. ज्यात 231 पुरुष आणि 29 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या