
एअरटेल, व्होडाफोन आणि जियोने आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स आणल्या आहेत. त्यात भरपूर डेटा आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. या ओटीटीमध्ये Zee 5, डिस्ने+हॉटस्टार आणि ऍमेझॉन प्राईमचा समावेश आहे.
एअरटेलच्या 298 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GBचा डेटा मिळतो त्यात एक महिन्याचे ऍमेझॉन प्राईमचेही सबक्रिप्शन मिळते. तसेच या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. जियोची 598 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GBचा डेटा मिळतो. तसेच डिस्ने-डिस्ने+हॉटस्टारचे व्हिआयपी सबस्क्रिप्शन मिळतं. या सबस्क्रिप्शनची वॅलिडीटी एक वर्षाची असते.
असाच प्लॅन एअरटलकडेही आहे. एअरटेल 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये दिवसाला 2 GB डेटाची सुविधा मिळते या प्लॅनची वॅलिडीटी एक वर्षाची असून यासोबत डिस्ने+हॉटस्टारचे सबस्क्रिप्शनही मिळते. व्होडाफोन आयडीच्या 595 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 GBचा डेटा मिळतो तर त्यासोबत Zee 5 चे ही सबस्क्रिप्शन मिळते.
जियोचा 2 हजार 599 चा एक लाँग टर्म प्रीपेड प्लॅन आहे. त्यात ग्राहकांना दररोज 2 GB तर 10 GBचा अतिरिक्त डेटा मिळतो. तसेच डिस्ने+हॉटस्टारचे व्हीआयपी सबस्क्रिप्शन मिळतं. या प्लॅनची वॅलिडीटी एक वर्षाची आहे. एअरटेलच्या 2 हजार 498 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 GBचा डेटा मिळतो. त्याची वॅलिडीटी एक वर्षाची असून ग्राहकांना ऍमेझॉन प्राईम मोबाईलचे सबस्क्रिप्शन मिळतं.
एअरटेलच्या 2 हजार 698 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने+हॉटस्टारचे सबस्क्रिप्शनची सुविधा मिळते. तसेच ऍमेझॉन प्राईमची ३0 दिवसांसाठी मेंबरशीप मिळते. व्होडाफोनच्या 2 हजार 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 1.5 GBचा डेटा मिळतो. या प्लॅनची वॅलिडीटी एक वर्षाची असून त्यात Zee 5 चेही सबस्क्रिप्शन मिळते. तर व्होडाफोन आयडियाच्या 2 हजार 595 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GBचा डेटा आणि डिस्ने+हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळतं.






























































