
सरकारच्या नियोजनाअभावी खारघरमध्ये 14 श्री सदस्यांचा हकनाक बळी गेला. आता रिफायनरी नको म्हणून शांततेत आंदोलन करणाऱया बारसू पंचक्रोशीतील गावकऱयांवर लाठीचार्ज करण्यात आला. अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडण्यात आल्या. ही तर राक्षसी राजवट आहे, असा संताप राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. मोजणीसाठी लाठीचार्ज करणारे उद्या गोळ्याही घालतील, पण ही दडपशाही महाराष्ट्र पाहत असून ही विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. सरकारने एक लक्षात ठेवावे गावकऱयांनी आज गवत जाळले आहे, उद्या ते प्रकल्प जाळतील, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.




























































