
सामना ऑनलाईन । मुंबई
गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचं रविवारी निधन झालं. पर्रीकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत मनोहर पर्रीकर हे राफेल व्यवहाराचे पहिले बळी होते, असं वादग्रस्त विधान केलं आहे.
Jitendra Awhad,NCP: #ManoharParrikar was a very educated and well read person.I think after Rafale deal he did not feel right so he decided to go back to Goa.He was sad. I should not say this as he is not here today but I feel he is the first victim of the #RafaleDeal pic.twitter.com/taLYhBlUNJ
— ANI (@ANI) March 18, 2019
पर्रीकर यांच्या निधनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. ”मनोहर पर्रीकर हे उच्चशिक्षित होते. मला वाटतं की ते राफेल व्यवहारामुळे नाखुश होते. त्यामुळे त्यांनी गोव्याला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. आज ते नाहीत तर आपण असं विधान करणं योग्य नाही. पण मला वाटतं की, ते राफेल व्यवहाराचे पहिले बळी होते”, असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.





















































