
रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या चलनी नोटा चलनातून बाद करण्याचे ठरवले आहे. 19 मे रोजी याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यासाठी जनतेला मुदत देण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी त्यांच्याकडील दोन हजाराच्या नोटा बँकेतून बदलून घेण्याचे आवाहन केले आहे. या नोटबंदीमुळे विरोधकांनी केंद्र सरकरावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही नोटबंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत. आता साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी, म्हणजे इतिहासाची कम्प्लिट पुनरावृत्ती होऊन जाईल, असे व्टिट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 मे रोजी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे 2 हजारच्या नोटा आहेत, त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक 2 हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात.
आरबीआयने सांगितले की, 2000 रुपयांची नोट कोणत्याही बँकेत बदलता येते. नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट बँकेत जाण्याची गरज नाही. कोणत्याही बँकेला भेट देऊन या बदलून घेतल्या जाऊ शकतात. या निर्णयावर केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे.

































































