पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरिवली -गोरेगाव स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी ( 5 फेब्रुवारी 2023 रोजी) सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

ब्लॉकच्या कालावधीत सर्व अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या गाड्या बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही बोरिवली लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत बोरिवलीतील फलाट क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर लोकल येणार नाहीत किंवा सोडल्या जाणार नाहीत.