पंतप्रधान मोदी हिंमत दाखवा, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा – कपिल सिब्बल

पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही हिंमत दाखवा आणि पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, असं राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करत देशाला संबोधित केलं. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सिब्बल असं म्हणाले आहेत.

कपिल सिब्बल म्हणाले की, “पाकिस्तान हा दहशतवादाचा स्रोत आहे. आज मी तुम्हाला (पंतप्रधान मोदी यांना) खात्री देतो की, विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहे. मी विरोधी पक्षाच्या वतीने बोलू शकत नाही. पण मला माहित आहे की, या लढाईत विरोधी पक्ष तुमच्यासोबत आहे. मी तुमच्यासोबत आहे, हिंदुस्थानातील जनता तुमच्यासोबत आहे.”

ते म्हणाले, “आम्हाला दहशतवाद संपवायचा आहे, पण तुम्ही हिंमत दाखवा, पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा आणि नंतर अमेरिकेला सांगा की ते पाकिस्तानसोबत व्यापार करू शकत नाही.”