कात्रज परिसरात 10 लाखांचा चरस जप्त, तस्कराला अटक, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कात्रज परिसरातील मांगडेवाडीत चरस विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून 10 लाख 21 हजारांचे 1 किलो 21 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. सरफराज मुजफ्फर खान (वय 35, रा. मांगडेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी कर्मचारी कात्रज परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मांगडेवाडी परिसरात एकजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सरफराजला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 लाख 21 हजार रूपये किंमतीचा १ किलो 21 ग्रॅम चरस, मोबाइल असा मिळून 10 लाख 31 हजारांचा ऐवज जप्त केला.

पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके तपास करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक, एस. डी. नरके, संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, आप्पा रोकडे, साहिल शेख, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिशा खेवलकर यांनी केली.