केडगाव हत्याकांडप्रकरणी सीआयडीला न्यायालयाची नोटीस, विचारला सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर केडगावतील हत्याकांडप्रकरणी न्यायालयामध्ये आरोपपत्र वेळेत दाखल केले नाही म्हणून सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अरुणकुमार सपकाळे यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एस पाटील यांनी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी त्यांना आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

केडगाव येथील हत्याकांडाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. सुरुवातीला हा तपास पोलिसांनी केला होता. त्यानंतर सदर तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. काही दिवसापूर्वीच न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये १० आरोपींचा समावेश होता मात्र न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करताना सीआयडीने ८ आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केले होते. येथील न्यायालयाने काल सीआयडीचे सपकाळ यांना नोटीस बजावून आरोपपत्र वेळेमध्ये पूर्ण केले नाही यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

या प्रकरणात आमदार संग्राम जगताप आणि बाळासाहेब कोतकर यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल न झाल्याने त्यांना जामीन मिळाला आहे. आता न्यायालयाने सीआयडीला नोटीस पाठवून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.