संजय दत्त इज बॅक! पाहा ‘केजीएफ 2’ चा जबरदस्त टीझर

2018 ला जबरदस्त हिट झालेला चित्रपट केजीएफच्या दुसऱ्या पार्टची लोकांमध्ये जरबदस्त उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर आज लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता यशच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. दुसऱ्या पार्टमध्ये अभिनेता संजय दत्त व अभिनेत्री रविना टंडन यांची एन्ट्री झाली आहे.

केजीएफच्या दुसऱ्या भागातून अभिनेता संजय दत्त दिर्घकाळाने व जीवघेण्या आजाराशी लढा देऊन आल्यानंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात संजय दत्त ‘अधिरा’ या खलनायकाची भूमिका साकारत आहे. तसेच अभिनेत्री रविना टंडन देखील बऱ्याच दिवसांनी एका जबरदस्त भूमिकेत दिसणार आहे.

2018 मध्ये केजीएफ चित्रपट रीलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद मिळाला होता. गेल्या वर्षी संजय दत्तच्या वाढदिवसाला त्याचा या चित्रपटातील पोस्टर रिलीज करण्यात आला होता. हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र त्यानंतर संजय दत्त आजारी पडल्याने या चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते. लॉकडाऊन व संजय दत्तचे आजारपण यामुळे पुढे ढकलेल्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

पाहा केजीएफ 2 चा टीझर  –

आपली प्रतिक्रिया द्या