खालापुरातील रासायनिक कंपन्यांचा जिवाशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, खालापूर

धामणी व खरसुंडी येथील कलर देणाऱ्या कंपन्यांच्या घातक रसायनांमुळे तीन महिन्यांपूर्वी खालापूरकर घुसमटल्याची घटना ताजी असतानाच पाताळगंगा नदीत पुन्हा एकदा मृत माशांचा खच पडला आहे. याविरोधात गावकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर खडबडून जाग आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱयांनी नेहमीप्रमाणेच पाण्याचे नमुने घेण्याचा फार्स पूर्ण केला. मात्र सरकारी बाबूंच्या या दुर्लक्षामुळे रासायनिक कंपन्या जिवाशी खेळ करत आहे.

खालापूर हद्दीतून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीत सतत दोन दिवस हजारो मासे मृत होऊन तरंगत होते. शिवाय पाण्याचा बदलेला रंग यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नदीच्या पाण्याचा वापर करणारी गावे, वाडय़ा-वस्तीमधील ग्रामस्थांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. नदीवर अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची योजना असल्यामुळे उपसभापती विश्वनाथ पाटील यांनी तहसीलदार इरेश चप्पलवार यांची तातडीची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

याशिवाय खालापूरहद्दीत वनवे निंबोडे व दांडवाडी लगत पाताळगंगा नदीत वाहत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण होण्याच्या शक्यता जास्त असल्याने खालापूर नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष दीपक नाईक व ग्रामस्थांनी पाहणी करून रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचला. गावकऱ्यांच्या संतापानंतर तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर चप्पलवार यांनी पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

summary- khalapur companies are poisoned rivers