खिमा पाव

सामना ऑनलाईन । मुंबई

साहित्य –

मटण खिमा अर्धा किलो, ४ मोठे कांदे बारीक चिरून, २ मध्यम टॉमेटो बारीक चिरून, आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट (आकडीप्रमाणे), २ तमालपत्र, ५ ते ६ मिरी दाणे, थोडे तेल, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मटण मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबिर

कृती –
सर्वप्रथम खिमा थोडी हळद आणि आलं-लसूण पेस्ट (अर्धा चमचा) टाकून शिजवून घ्या. छोट्या कुकरमध्ये ५ शिट्यांत शिजतो. खिमा थंड झाला की कढईत तेल घेऊन गरम करा. यात मिरी दाणे आणि तमालपत्र टाका. यानंतर कांदा परतून घ्या. चांगला गुलाबी की टोमॅटो परतून घ्या. टोमॅटो मऊ झाला की यात आवडीप्रमाणे आल-लसूण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, हळद, आणि लाल तिखट घालून परतून घ्या.

मग यात १ चमचा मिट मसाला घाला. यानंतर त्यात खिमा घाला. सर्व मिश्रण परतून घ्या. त्यात थोडे पाणी घाला आणि वरून १ चमचा गरम मसाला घाला. छान एकत्र करून घ्या. मीठ घाला. ग्रेव्ही हवी असेल तर त्यानुसार पाणी वाढवावे. खिमा आधीच शिजवल्यामुळे फार वेळ लागणार नाही. ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. आच बंद करून वरून कोथिंबीर भुरभुरावी. गरमागरम भाकरीबरोबर दिलीत तर उत्तम.