
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
हिंदुस्थानचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने मोठी झेप घेतली आहे. चीनच्या लीनिंग या क्रीडा ब्रॅण्डने त्याच्यासोबत चार वर्षांसाठी 35 कोटींचा करार केला आहे. सहा सुपर सीरिज जिंकणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरलेला किदाम्बी श्रीकांत यावेळी म्हणाला, ली निंग या जागतिक क्रीडा ब्रॅण्डशी जोडले गेल्याचा अभिमान आहे. त्यांचे प्रॉडक्ट मला आवडते. आता खेळामध्ये आणखी चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. दरम्यान, ली निंग या ब्रॅण्डचे हिंदुस्थानातील पार्टनर असलेले सनलाइट स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक महेंदर कपूर म्हणाले, आमचा ब्रॅण्ड क्वॉलिटी व सातत्य या सूत्रांवरच आधारित आहे. किदाम्बी श्रीकांतमध्ये या दोन्ही बाबी आहेत. त्यामुळेच त्याची निवड करण्यात आली.



























































