
सामना ऑनलाईन, तिनसुकीया
दीब्रूगड-रंगजिशा एक्सप्रेस आणि अवध एक्सप्रेस या दोन गाड्यांच्या शौचालयात तरुणींचे मृतदेह सापडले होते. या दोघींवर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास दास आणि विपीन पांडे या दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीमध्ये जो तपशील कळाला तो ऐकून पोलिसांच्याही अंगावर शहारा आला आहे.
या दोघांनी तरुणींना बेशुद्ध करून त्यांच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर हत्या केली आणि दोघींना रेल्वेच्या शौचालयात फेकून दिलं. काही काळानंतर या दोघांनी तरूणींच्या मृतदेहासोबत पुन्हा संभोग केला आणि पळून गेले. १० जुलै रोजी दीब्रूगड-रंगजिशा एक्सप्रेसमध्ये पहिला मृतदेह सापडला होता, या घटनेला ३० तास उलटून जाताच दुसरा मृतदेह देखील सापडला होता. पोलिसांनी विकास दासला तिनसुकीया रेल्वे स्थानकातून अटक केली होती तर पांडेला दिब्रूगड-बंगळुरू एक्सप्रेसमधून उचचला होता.


























































