कोईम्‍बतूरमधील उद्योजकांतर्फे हिंदुस्थानची पहिली सेफ्टी लाइफस्‍टाइल कंपनी ‘माय’ सादर

दर्जात्‍मक वैयक्तिक सुरक्षा गिअरसाठीची गरज झपाट्याने सर्व वयोगटामध्‍ये रोजच्‍या जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण भाग बनत असताना कोईम्‍बतूरमधील दोन तरूण उद्योजक केविन कुमार कंदासामी आणि राजा पालनीसामी यांनी वैयक्तिक जीवनशैली ब्रॅण्‍ड ‘माय’ सादर केला आहे.

ही नवीन कंपनी नाविन्‍यता, डिझाइन व शाश्‍वत विकासासह भारतामध्‍ये बनवण्‍यात आलेल्‍या सुरक्षितता उत्‍पादनांची डिझाइन, उत्‍पादन व निर्मितीप्रती समर्पित आहे. द सिक्‍स्‍थ यूएन एन्‍हायरोन्‍मेंट एक्झिक्‍युटिव्‍ह डायरेक्‍टर व युनायटेड नेशन्‍स, यूएनईपीचे अंडर-सेक्रेटरी-जनरल एरिक सोल्‍हेम आणि यूथिंक इंटरनॅशनल फाऊंडेशनचे संस्‍थापक के. अब्‍दुल घानी यांच्‍या उपस्थितीमध्‍ये कंपनीचे उद्घाटन करण्‍यात आले.

या सादरीकरणाचा भाग म्‍हणून कंपनीने अद्वितीय इंडियन-मेड यूव्‍ही वन पॉकेट सॅनिटायझर व यूव्‍ही सेफ टेबलटॉप सॅनिटायझर यांच्‍यासह इतर स्‍वदेशी उत्‍पादने जसे अॅण्‍टी-व्‍हायरल प्रोटेक्‍शन मास्‍क्‍स, स्‍कार्व्‍हस् आणि ओव्‍हरऑल्‍सच्‍या सादरीकरणाची घोषणा केली आहे. ही उत्‍पादने हिंदुस्थानचा स्‍थानिक पुरवठा साखळ्यांना चालना देण्‍यासाठी, तसेच कोविड-१९ व भविष्‍यात इतर कोणत्‍याही जागतिक आरोग्‍यविषयक संकटादरम्‍यान हिंदुस्थानींच्‍या सुरक्षेची काळजी घेण्‍यासाठी महत्त्वाची असतील.

या सादरीकरणाबाबत बोलताना ‘माय’चे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी केविन कुमार कंदासामी म्‍हणाले, ”आम्‍हाला पूर्णत: डिझाइन केलेला आमचा मेड इन इंडिया जीवनशैली ब्रॅण्‍ड ‘माय’ सादर करण्‍याची घोषणा करण्‍याचा अभिमान वाटतो. या ब्रॅण्‍डमध्‍ये तंत्रज्ञान-संचालित उत्‍पादने व सेवांचा समावेश असेल, ज्‍या आपल्‍या दैनंदिन जीवनशैलीमधील सुरक्षिततेच्‍या सर्वात महत्त्वपूर्ण पैलूंची पूर्तता करतील.

आम्‍ही संशोधन व विकास आणि उत्‍पादनामध्‍ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ज्‍यामधून आपण एक देश म्‍हणून भविष्‍यात कोणत्‍याही आरोग्‍यविषयक संकटांचा सामना करण्‍यामध्‍ये, तसेच जागतिक पुरवठा साखळ्यांवरील आपली अवलंबता कमी करण्‍यामध्‍ये सक्षम असू, याची खात्री मिळू शकते. आमची कंपनी हिंदुस्थानींचे संरक्षण करण्‍यासोबत डिझाइन व उत्‍पादनामधील लाइफस्‍टाइलच्‍या रूपात वैयक्तिक सुरक्षात्‍मक गिअरमध्‍ये जागतिक आघाडीची कंपनी म्‍हणून विकसित होईल.”

मायबाबत अधिक माहितीसाठी कृपया www.myprotection.in येथे भेट द्या.

आपली प्रतिक्रिया द्या